Wednesday, March 26, 2014

Confessions of a restless mind

Once again lies a fork in the path ahead..
I wonder - which way to go, which path to tread!

Whichever way you take -
"There will be trials.." - my mind says,
"And Loved ones will be missed" - my heart says

How I wish, life was a just a straight plain road,
No regrets, no missed chances - just a tranquil abode

O GOD, can't you just tell me what to do?
Wouldn't life be easier if that were to be true?

Why, oh why do you always make me choose?
My mind focusing on how much there is to lose..

I know, I know there will be gains too!
But I just want it ALL, what can I do?

हे असं केलं पाहिजे

हे असं केलं पाहिजे 

आयुष्यावर, जगण्यावर प्रेम करता यायला पाहिजे
जगाच्या पाठीवर कुठेही आपलं घरट बांधता यायला पाहिजे 

जगण्याचा अर्थ शोधत न बसून,
असच नुसतं, सहज, सोपं जगता यायला पाहिजे 

काय मिळालं, काय सुटलं, काय चुकलं ह्याचं गणित न मांडता
जे काय आहे तेच सुंदर, सुरेख करता यायला पाहिजे 

furniture, भांडी, सजावटीचं सामान - ह्यांनी घर होतं असं न मानता
रिकाम्या खोलीत सुद्धा घरपण शोधता यायला पाहिजे 

दुसऱ्याला एखादी गोष्टं कशी जमते, आणि आपल्याला का नाही, ह्याचा विचार न करता 
आपल्याकडे जे आहे त्याचा पुरेपूर वापर करता यायला पाहिजे 

स्वतःसाठी वेळ हवा, मुलांबरोबर वेळ हवा असं नुसतं न म्हणता
मिळ्तोय तो वेळ सारथी लावता यायला पाहिजे 

फार आसक्ती असणारी गोष्टं  गमावल्यावर सुद्धा,
त्या गोष्टी शिवाय जीवन जगता यायला पाहिजे 

जे निसटलं ते निसटलं, जे सूटलं ते सूटलं हे जाणून,
नव्या दमाने दिवसाला सामोरं जाता यायला पाहिजे 

मुलांच्या हस्ण्यतच नव्हे, तर मुलांच्या रडण्यात सुद्धा सुख शोधता यायला पाहिजे 

आनंदाचे क्षण आयुष्यात नाहीच असं होऊ शकत नाही,
पण त्या क्षणातला आनंद दिसण्याची कला जमली पाहिजे 

लिहिता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे, नोकरी सांभाळून घरचं, मुलांचं नीट करता यायला पाहिजे,
असं  सारखं वाटत असलं तरीही ते सगळं जमण्याचा अट्टहास सोडता आला पाहिजे 

आणि मुख्य म्हणजे - हे सगळं लिहिण्यापुरतं नाही तर अमलात आणता यायला पाहिजे!

तळ्यात मळ्यात

तळ्यात मळ्यात 
____________________________________________________

दिवा काही क्षणांपुरता तेवून आजुबाजू उजळून टाकणारा 
पाऊस थोड्या वेळच पडून सुखद गारवा देऊन जाणारा 

लहान बाळाचं छोटसं हसू सुद्धा मन आनंदून  टाकणारं 
फुलाचं एकच दिवसासाठी उमलण, पण मंद सुवास पसरवणारं 

सगळच कसं ते क्षणभंगूर - पण सगळच कसं मोहात पडणारं 

आनंदाचे क्षण जर असे आहेत सर्रकन निघून जाणारे 
तर दुख्खाचे दिवस सुद्धा खरच टिकून न राहणारे

शीषीरात झडून गेलेली पानं परत वसंतात झाडावर हिरवा गालीचा घालणारी,
अमावास्येच्या काळ्या रात्रीनंतर सूर्याची केशरी किरणे आसमंत उजळून टाकणारी 

काळ्या ढगांच्या  आडून सुद्धा सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान डोकावणारी,
एका उदास झालेल्या मनाला अगदी हवाहवासा दिलासा देणारी 

रात्री नंतरची सकाळ कितीतरी नव्या शक्यता घेऊन येणारी,
संध्याकाळी लागलेली हुरहूर पार विसरायला लावणारी 

निसर्गाचे हे नियमितपणे  वागणेच किती रोज बदलणारे,
तळ्यात मळ्यात ल्या त्या लहानग्या खेळाची आठवण करून देणारे

Past and Present..

Past has passed, whether it was happy or sad
Along with it gone, memories good and bad

Past has passed, now I see it all clear and bright
Always 20-20 they say, it is that damn hindsight

Past has passed, filled with mistakes and regrets on a whole
With attempts of trying to fit a square peg in a round hole!

Past has passed, taking with it moments that are best forgotten,
Then there are some to hold onto, like a dream not to be broken!

Past has passed, bringing me to today's present
A challenge ahead, and a road of steep ascent

Present is here right now, soon to become the unchangeable past
Treat it well, handle it with care, because it won't forever last!

अपराधी मन

कसं वाटत असेल एखाद्या अपराध्याला? मग तो अपराध जाणून बुजून केलेला असो किंवा चुकून झालेला असो… 
___________________________________________________
दाटून आले धुके , चहुबाजूला पसरला धूर 
वाट चुकली आणि घर राहिले खूप दूर 

डोळ्यात भरून येतो आठवणींचा पूर 
त्यातच मग शोधते जीवनाचा हरवलेला सूर 

मनाची सोबती आहे आता एक कायमची हूर हूर 
डोक्यात विचार माजवतात भलताच काहूर 

स्वप्नात ठोठ्वते मी माझ्या घराचे दार ,
सत्यात मात्र मी असते साता समुद्रा पार 

दिवस रात्रीचे चालूच राहते निरंतर सत्र 
एका अपराधी मनाला शिक्षाच जणू मात्र …  

सरेल का हे धुके कधी?  सापडेल का परत वात जुनी ?
आयुष्य समेवर येउन थांबेल का कधी? सोबतीला तेव्हा असेल का कुणी?  
_____________________________________________________ 

सुख सुख म्हणजे?

सुख सुख म्हणजे नक्की काय असतं ?
ते नुसतं मानण्यावर असतं, का मिळवण्यावर असतं?
सुख सुख म्हणजे काय असतं ?
न मागता देवानी दिलेल्या गोष्टींमध्ये असतं,
का मागितलेलं  सगळं मिळालं ह्या समाधानात असतं?
सुख सुख म्हणजे ते कसं  असतं ?
ते कशाशी खायचं , कशाबरोबर प्यायचं असतं?
दुखानंतर मिळालेलं सुख खरच का जरा जास्तं गोड लागतं?
सुख सुख म्हणजे ते कुणाला मिळतं?
शेवट पर्यन्त वृक्षाबरोबर राहणाऱ्या हिरव्या-गार पानाला ते मिळतं? का 
झाडापासून गळलेल्या पानाला वाऱ्याबरोबर मुक्तं विहार करताना मिळतं?
वडलोपार्जित घरात आठवणींच्या उबदार कुशीत राहून ते मिळतं? का 
स्वतः बांधलेल्या घरात नवीन आठवणी रुजवण्यात ते मिळतं?
मला सांगा सुख म्हणजे खरंच नक्की काय असतं ?
ते खरच का मागच्या जन्मीच्या पुण्ण्यावर असतं ?

किनारा

नावाड्या - तू रोज जातोस ह्या तीरावरून त्या तीरी,
सांग मला - पैलतीरावर वेगळं असं आहे काय तरी?

त्या तीरावर खरच आहे का सगळं सुंदर, स्वच्छं, मोठं , नयन-रम्य आणि मनोहर,
निसर्ग सौंदर्य, शिस्त-प्रिय माणसं, खूप श्रीमंती ज्यानी दिपून जाते नजर?

असे का भासते मला कि सागराचे हे दोन किनारे खूप आहेत विसंगत,
का बरं  समुद्राच्या पाण्यातल्या मीठाप्रमाणे ते एकमेकात नाही मिसळत?

त्या दोन किनाऱ्यांना वेगळा ठेवणारा मोठा प्रशांत असा तो जल समूह,
दोन्ही तीरावरील लोकं मात्र जणू तोडू पाहत आहेत आपलंच एक चक्रव्युह!

खुपदा वाटतं - नावाड्या - तुझ्या त्या होडीत बसावं ,
एकदा ह्या तीरी, एकदा त्या तीरी, दोन्ही कडे घर थाटाव. 

नावाड्या मात्र सांगतो मला:
बाई असा विचारही नका करू,
होडी तुम्हाला लागते, हे नका विसरू!

प्रत्येक तीरावरची आपलीच एक गोष्टं , आपलीच एक मजा, आणि आपलीच दुखं
कुठेही राहिलात तरी प्ररभ्द टाळणे कुणाला आजवर झालाय शक्य?

मला विचाराल तर - ज्याला त्याचा किनारा सापडला तोच खरा भाग्यवंत
रोज त्याला मिळती ओळखीचीच माणसं , आणि एक सवयीचा आसमंत !!