वेचित जाणे आठवण प्रत्येक
ही स्वप्ने न व्हावी डोइजडं,
अस्तित्वावर राहूदे भक्कम पकडं
म्हणतात प्रयत्ने वाळुचे कण रगडिता, तेल ही गळे
आणि आपल्या माणसांची साथ असता, भयं सारे पळे
गरूडा सारखी उंच घ्या भरारी,
मात्र विसरु नका ठेवले जे माघारी
पूढे पूढे चालत राहाणे, याच्यातच गंमतं,
शिषिर ऋतु पाठोपाठ, येतच असतो वसंतं
असंबंध, पराधीन, निराश कधी वाटते
सु़खं-दु:खाचे चक्र निरंतर चालुच राहते
एक साधलं की दुसरं लक्ष्य आव्ह्यान देतं
मग मन वेडं त्यामागे धावतच जातं
हो, ह्याच धावपळीचं नाव तर जीवन आहे,
सतत वाहत राहाणं, हाच पाण्याचा धर्म आहे!
-- आरती रहाळकर