सुख सुख म्हणजे नक्की काय असतं ?
ते नुसतं मानण्यावर असतं, का मिळवण्यावर असतं?
सुख सुख म्हणजे काय असतं ?
न मागता देवानी दिलेल्या गोष्टींमध्ये असतं,
का मागितलेलं सगळं मिळालं ह्या समाधानात असतं?
सुख सुख म्हणजे ते कसं असतं ?
ते कशाशी खायचं , कशाबरोबर प्यायचं असतं?
दुखानंतर मिळालेलं सुख खरच का जरा जास्तं गोड लागतं?
सुख सुख म्हणजे ते कुणाला मिळतं?
शेवट पर्यन्त वृक्षाबरोबर राहणाऱ्या हिरव्या-गार पानाला ते मिळतं? का
झाडापासून गळलेल्या पानाला वाऱ्याबरोबर मुक्तं विहार करताना मिळतं?
वडलोपार्जित घरात आठवणींच्या उबदार कुशीत राहून ते मिळतं? का
स्वतः बांधलेल्या घरात नवीन आठवणी रुजवण्यात ते मिळतं?
मला सांगा सुख म्हणजे खरंच नक्की काय असतं ?
ते खरच का मागच्या जन्मीच्या पुण्ण्यावर असतं ?
No comments:
Post a Comment