तळ्यात मळ्यात
____________________________________________________
दिवा काही क्षणांपुरता तेवून आजुबाजू उजळून टाकणारा
पाऊस थोड्या वेळच पडून सुखद गारवा देऊन जाणारा
लहान बाळाचं छोटसं हसू सुद्धा मन आनंदून टाकणारं
फुलाचं एकच दिवसासाठी उमलण, पण मंद सुवास पसरवणारं
सगळच कसं ते क्षणभंगूर - पण सगळच कसं मोहात पडणारं
आनंदाचे क्षण जर असे आहेत सर्रकन निघून जाणारे
तर दुख्खाचे दिवस सुद्धा खरच टिकून न राहणारे
शीषीरात झडून गेलेली पानं परत वसंतात झाडावर हिरवा गालीचा घालणारी,
अमावास्येच्या काळ्या रात्रीनंतर सूर्याची केशरी किरणे आसमंत उजळून टाकणारी
काळ्या ढगांच्या आडून सुद्धा सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान डोकावणारी,
एका उदास झालेल्या मनाला अगदी हवाहवासा दिलासा देणारी
रात्री नंतरची सकाळ कितीतरी नव्या शक्यता घेऊन येणारी,
संध्याकाळी लागलेली हुरहूर पार विसरायला लावणारी
निसर्गाचे हे नियमितपणे वागणेच किती रोज बदलणारे,
तळ्यात मळ्यात ल्या त्या लहानग्या खेळाची आठवण करून देणारे
No comments:
Post a Comment