हे असं केलं पाहिजे
आयुष्यावर, जगण्यावर प्रेम करता यायला पाहिजे
जगाच्या पाठीवर कुठेही आपलं घरट बांधता यायला पाहिजे
जगण्याचा अर्थ शोधत न बसून,
असच नुसतं, सहज, सोपं जगता यायला पाहिजे
काय मिळालं, काय सुटलं, काय चुकलं ह्याचं गणित न मांडता
जे काय आहे तेच सुंदर, सुरेख करता यायला पाहिजे
furniture, भांडी, सजावटीचं सामान - ह्यांनी घर होतं असं न मानता
रिकाम्या खोलीत सुद्धा घरपण शोधता यायला पाहिजे
दुसऱ्याला एखादी गोष्टं कशी जमते, आणि आपल्याला का नाही, ह्याचा विचार न करता
आपल्याकडे जे आहे त्याचा पुरेपूर वापर करता यायला पाहिजे
स्वतःसाठी वेळ हवा, मुलांबरोबर वेळ हवा असं नुसतं न म्हणता
मिळ्तोय तो वेळ सारथी लावता यायला पाहिजे
फार आसक्ती असणारी गोष्टं गमावल्यावर सुद्धा,
त्या गोष्टी शिवाय जीवन जगता यायला पाहिजे
जे निसटलं ते निसटलं, जे सूटलं ते सूटलं हे जाणून,
नव्या दमाने दिवसाला सामोरं जाता यायला पाहिजे
मुलांच्या हस्ण्यतच नव्हे, तर मुलांच्या रडण्यात सुद्धा सुख शोधता यायला पाहिजे
आनंदाचे क्षण आयुष्यात नाहीच असं होऊ शकत नाही,
पण त्या क्षणातला आनंद दिसण्याची कला जमली पाहिजे
लिहिता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे, नोकरी सांभाळून घरचं, मुलांचं नीट करता यायला पाहिजे,
असं सारखं वाटत असलं तरीही ते सगळं जमण्याचा अट्टहास सोडता आला पाहिजे
आणि मुख्य म्हणजे - हे सगळं लिहिण्यापुरतं नाही तर अमलात आणता यायला पाहिजे!
No comments:
Post a Comment